संतापजनक !  हिंदू तरुणाचा निर्घृण खून, ४२ दिवसांतील १३ वी हत्या
संतापजनक ! हिंदू तरुणाचा निर्घृण खून, ४२ दिवसांतील १३ वी हत्या
img
वैष्णवी सांगळे
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचार वाढतच चालले आहे. बांगलादेशच्या फेनी जिल्ह्यातील दागोनभुईयान भागात पुन्हा एका हिंदू तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे  गेल्या ४२ दिवसांतील ही १३ व्या हिंदू व्यक्तीची हत्या असल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे. 

 माहितीनुसार, समीर दास असं मृत हिंदू तरुणाचे नाव होते. तो केवळ २८ वर्षाचा होता. समीर दास हा दगनभुआच्या मातुभुईया युनियनमधील रामानंदपूर गावचा रहिवासी होता. तो गेल्या अनेक वर्षांपासून ऑटोरिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. ११ जानेवारीच्या रात्री चितगाव येथील दागनभुईयान येथे त्याची चाकूने वार आणि गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्येनंतर आरोपी रिक्षा घेऊन फरार झाले.

रविवारी रात्री समीर घरी परत आला नाही तेव्हा कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. पण तो कुठेच भेटला नाही त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांना उपजिल्हा रुग्णालयात त्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना दरोडा आणि हत्येची असल्याचे दिसून येत आहे तर समीरची हत्या हा पूर्वनियोजित कट असल्याचेही अनेकांकडून म्हटले जात आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरु असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

गेल्या काही दिवसांत बांगलादेशात अनेक हिंदू तरुणांची हत्या करण्यात आली आहे. १८ डिसेंबर रोजी मयमनसिंग जिल्ह्यातील भालुका भागात जमावाने दिपू चंद्र दास यांची हत्या केली. त्यानंतर  २५ डिसेंबर रोजी अमृत मंडल या आणखी एका हिंदू तरुणाचीही हत्या करण्यात आली. बांगलादेशमध्ये गेल्या ४२ दिवसामध्ये १३ हिंदू व्यक्तींची हत्या करण्यात आली. सुमारे १७ कोटी लोकसंख्या असलेल्या मुस्लिम बहुल बांगलादेशमधील परिस्थिती २०२४ पासून बिघडत चालली आहे. हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group