बांगलादेश ; इस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास प्रभू यांना अटक
बांगलादेश ; इस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास प्रभू यांना अटक
img
दैनिक भ्रमर
बांग्लादेशातील सत्तांतरानंतर हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत.दरम्यान , बांगलादेशात सत्ता संघर्षादरम्यान  6 ऑगस्ट रोजी बांगलादेशातील खुलना जिल्ह्यात इस्कॉन मंदिराला लक्ष्य करण्यात आले होते. यामध्ये भगवान जगन्नाथाच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली होती. दरम्यान , बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात बोलणारे इस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास प्रभू यांना पोलिसांनी अटक केली आहे. चिन्मय कृष्ण दास प्रभू यांना ढाका विमानतळावर ताब्यात घेण्यात आल्याचा दावा बांगलादेशी मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. इस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास प्रभू यांनी 22 नोव्हेंबर रोजी बांगलादेशातील रंगपूर येथे हिंदूंच्या समर्थनार्थ रॅली काढली होती. त्यामुळे चिन्मय कृष्ण प्रभू यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या रॅलीत हिंदूंवरील हल्ल्यांचा निषेध करण्यात आला होता. त्यादरम्यान काही लोकांनी न्यू मार्केट चौकातील आझादी स्तंभावर भगवा झेंडा फडकावला होता. या ध्वजावर आमी सनातनी असे लिहिले होते. याबाबत त्यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group