"या" कारणातून नाशिकमधील शिवाजीनगरला २० वर्षीय युवकाचा खून
img
दैनिक भ्रमर
सातपुर :  बहिणीला प्रपोज केल्याच्या कारणातून भावाने व त्याच्या तीन साथीदारांनी बेदम मारहाण केल्याने युवक ठार झाल्याची घटना नाशिकच्या सातपूर परिसरात घड्ली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार , सोमवार ( दि. २६) रात्री ९ वाजता शिवाजीनगर दत्त मंदिर रोडवर हा प्रकार घडला. रात्री उशिरापर्यंत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करायचे काम सुरू होते. नसीम शहा (१९) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नसीम शाह रा. गुरुद्वार जवळ कार्बन नाका, शिवाजीनगर हा दत्त मंदिर रोडने कार्बन नाका शिवायनगरकडे  जात असताना संशयित आदित्य वाघमारे व त्याच्या तीन साथीदारांनी त्याला थांबवून बहिणीला प्रपोज टाकतो का, असे बोलून चौघांनी नसीमला बेदम मारहाण केली. 

यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्या असता त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शोध घेतला मात्र संशयित फरार झाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group