ठरलं...! आशिया कपच्या आयोजनावर शिक्कामोर्तब ! 'या' देशात होणार स्पर्धा
ठरलं...! आशिया कपच्या आयोजनावर शिक्कामोर्तब ! 'या' देशात होणार स्पर्धा
img
Dipali Ghadwaje
गेल्या अनेक दिवसांपासून आशिया कप 2025  बद्दल अनेक चर्चांना उधाण आले आहे. स्पर्धा होणार की नाही याबाबत सध्या सोशल मीडियावर अनेक तर्क-विर्तक लावण्यात येत आहे. त्याच संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज 24 जुलैला ढाका येथे झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीला बीसीसीआयने ऑनलाइन हजेरी लावली आहे. या बैठकीमध्ये आशिया कपवर चर्चा झाली असून स्पर्धेचे आयोजन करण्यात एकमत झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

 दरम्यान आशिया कप 2025 ची सुरुवात 8 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे तर या स्पर्धेचा अंतिम सामना 24 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या स्पर्धेत 8 संघ सहभागी होणार आहे. ज्यामध्ये भारत, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान , पाकिस्तान यांच्यासह एसीसी प्रीमियर कप जिंकणारा संघ हॉंगकॉंग, ओमान आणि यूएई भाग घेणार आहे. तर या स्पर्धेचे यजमान पद भारताकडे असणार आहे मात्र ही स्पर्धे यूएईमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. 2026 चा टी-20 विश्वचषक लक्षात घेऊन आशिया कप 2025 टी-20 स्वरूपात असणार आहे.
 
आशिया कपचा शेवटचा हंगाम 2023 मध्ये खेळला गेला होता. त्याचा अंतिम सामना कोलंबो येथे झाला होता ज्यामध्ये भारताने विजय मिळवला होता.  
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group