टी-20 विश्वचषक 2026 च्या साखळी फेरीत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत सुपर-8 फेरीत धडक मारली आहे. आता सर्वांचे लक्ष सुपर-8 टप्प्यातील सामन्यांकडे लागले आहे. आता चाहत्यांची नजर सुपर-8 मधील थरारक लढतींकडे लागली आहे. 22 फेब्रुवारी ते 1 मार्च रोजी सुपर-8 सामने खेळाले जाणार आहेत, भारताला सुपर-8 फेरीत एकूण 3 सामने खेळायचे आहेत.
भारताचे सुपर-8 सामन्यांचे वेळापत्रक
22 फेब्रुवारी: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका/यूएई, अहमदाबाद
26 फेब्रुवारी: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया/झिम्बाब्वे/आयर्लंड, चेन्नई
1 मार्च: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, कोलकाता
या तिन्ही सामन्यांमध्ये भारताला उपांत्य फेरीसाठी स्थान निश्चित करण्याची मोठी संधी असेल. प्रत्येक सामना निर्णायक ठरणार आहे. सुपर-8 पूर्वी भारताला अजून एक लीग सामना खेळायचा आहे. हा सामना 18 फेब्रुवारीला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघ आत्मविश्वासाने सुपर-8 फेरीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.