22 एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे घेतला आहे. ज्यामध्ये पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी छावण्यांवर हल्ला करण्यात आला.
अंदाजानुसार, पाकिस्तानने अमृतसरवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न करून प्रत्युत्तर दिले, त्यानंतर पश्चिम सीमेवरील शहरांना लक्ष्य करण्याचे वारंवार प्रयत्न केले. पाकिस्तानने आपले बहुतेक प्रयत्न तिथे केंद्रित केल्यामुळे जम्मूचे सर्वाधिक नुकसान झालं.
जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, राजौरी आणि बारामुल्ला, पंजाबमधील पठाणकोट आणि राजस्थानमधील जैसलमेर आणि गंगानगर येथेही वेगवेगळ्या भागांमध्ये हल्ले करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
भारतीय सैन्याचं कौतुक होत आहे
भारताने पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडले आहे. भारतीय सेनेच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. सगळेजण सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय सैन्याचं कौतुक करत आहेत आणि त्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. इंटरनेटवर आपल्या सैनिकांच्या कामगिरीने केवळ मने जिंकत नाहीत तर राष्ट्रीय एकतेची भावना बळकट करण्यासही हातभार लावत आहेत.
अशातच आपल्या भारतीय जवानाचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते प्रत्यक्षात सांगत आहेत की त्यांची 45 दिवसांची रजा रद्द करण्यात आली आहे आणि तो थोड्याच वेळात सैन्यात परतणार आहे.
भारत-पाकमध्ये जो तणाव सुरु आहे त्याच्याच्य कर्तव्यावर ते जाणार असल्याचं म्हणत त्यांनी म्हटलं की, “युद्ध नुकतेच सुरू झाले आहे. आम्ही 45 दिवसांच्या रजेसाठी आलो होतो. आम्हाला फोन आला, परत या म्हणून’. आम्ही अर्ध्यातूनच निघून आलो, आता घरी जाण्याची गरज नाही.”
त्यानंतर ते पुढे म्हणाले , “आता आम्ही तिथून परत येऊ की नाही माहिती नाही, पण भारताचं काहीही बिघडू देणार नाही याची हमी देतो. जेव्हा तुम्हाला भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्याचं ऐकायला मिळेल, तेव्हा तुम्ही खात्री करू शकता की तुम्हाला लाहोरमधून ही घोषणा ऐकायला मिळेल. आम्ही तुम्हाला तिथेच भेटू”. जवानाच्या या वाक्यामुळे भारतीयांच्या हृदयाला भावून जाणारी होती.
दरम्यान, मुलाखत घेणाऱ्याने जवान आईस्क्रीम खात असल्याने मिश्किलपणे म्हटलं की,”तुम्ही पुढचं आईस्क्रीम लाहोरमध्ये खाणार का?” त्यावर त्या शूर सैनिकाने हसत उत्तर दिले, होय, पुढंच आईस्क्रीम लाहोरमध्येच, आपण तिथेच जाणून आता रस पिऊ.” या सैनिकांने आत्मविश्वासाने जे म्हटलं त्यामुळे सर्वांच्या मनात आपल्या भारतीय सैन्याबद्दलचा आदर आणि अभिमान नक्कीच उंचावला. आपल्या भारतमातेसाठी , आपल्या देशासाठी हसत हसत आपला जीव पणाला लावणारे फक्त आपले जवानच असू शकतात एवढं मात्र नक्की.