अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ कार्डने जगभरात धुमाकूळ घातला आहे. त्यांनी 70 हून अधिक देशांना टॅरिफ लागू केला आहे. तो एका आठवड्यासाठी टाळण्यात आला. ट्रम्प यांनी भारत आणि रशियातील तेल व्यापारावर आक्षेप घेत शस्त्र खरेदी करारावरही नाराजी व्यक्त केली होती. टॅरिफ लावल्यानंतर भारताने रशियाकडून इंधन खरेदी थांबवली असा दावा त्यांनी केला होता.
हे ही वाचा...
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये देखील भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, या दाव्यांवर आता मोठा खुलासा झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने स्पष्ट केले आहे की, भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्या अजूनही रशियाकडून तेल खरेदी करत आहेत. रिफायनरीजना रशियन पुरवठादारांकडून सतत तेल मिळत आहे. खरेदीचे निर्णय हे केवळ किंमत, तेलाची गुणवत्ता, साठवणूक, वाहतूक आणि इतर आर्थिक घटकांच्या आधारे घेतले जातात.
हे ही वाचा...
रशिया दररोज सुमारे 9.5 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन करतो आणि त्यापैकी 4.5 दशलक्ष बॅरल तेल निर्यात करतो. त्यामुळे जागतिक बाजारात रशियन तेलाला मोठे महत्त्व आहे. दरम्यान, रशियाकडून तेल खरेदी बंद झाल्याच्या बातम्या सध्या तरी तथ्यहीन ठरल्या आहेत. भारताचा रशियासोबत तेल व्यवहार सुरूच आहे. हे व्यवहार जागतिक पातळीवरील कायदेशीर आणि आर्थिक निकषांनुसार चालू आहेत.