अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या घोषणेनंतर, अमेरिकेच्या सीमाशुल्क आणि सीमा संरक्षण विभागाने २७ ऑगस्टपासून भारतीय उत्पादनांवर अतिरिक्त शुल्क लागू करण्याबाबत मसूदा नोटीस जारी केली आहे. या निर्णयामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संबंधात मोठा तणाव निर्माण झाला आहे.
हे ही वाचा
सूचनेनुसार, "रशियन फेडरेशनच्या सरकारकडून अमेरिकेला येणाऱ्या धोक्यांना संबोधित करणे" या शीर्षकाच्या राष्ट्रपतींच्या ६ ऑगस्ट २०२५ च्या कार्यकारी आदेश १४३२९ ला लागू करण्यासाठी अतिरिक्त शुल्क लादण्यात येत आहे. २७ ऑगस्ट २०२५ रोजी प्रकाशित होणाऱ्या मसुद्याच्या सूचनेत असे म्हटले आहे की, गृह सुरक्षा सचिवांनी कार्यकारी आदेशानुसार युनायटेड स्टेट्सच्या हार्मोनाइज्ड टॅरिफ शेड्यूल (HTSUS) मध्ये बदल करणे आवश्यक असल्याचे निश्चित केले आहे.
हे ही वाचा
उद्या म्हणजेच २७ ऑगस्ट रोजी रात्री १२:०१ नंतर अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व भारतीय वस्तूंवर ५० टक्के शुल्क लागू होईल. आपल्या सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाला लक्षात घेऊन अमेरिकेने रशियाकडून कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादने यासारख्या काही वस्तूंच्या आयातीवर आधीच बंदी घातली आहे, असेही या सूचनेत म्हटले आहे.
हे ही वाचा
अमेरिकेच्या आर्थिक दबावाची पर्वा न करता सरकार यातून मार्ग काढेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी लहान दुकानदार, शेतकरी आणि पशुपालकांना आश्वासन दिले की सरकार त्यांच्या हिताचे रक्षण करेल. "आम्ही कोणताही दबाव सहन करू, पण मोदी तुम्हाला कधीही नुकसान होऊ देणार नाहीत," असे मोदी म्हणाले.