अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मोठा आर्थिक धक्का दिला आहे. रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवल्याबद्दल भारतावर 25 टक्के अतिरिक्त आयात शुल्क लावण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. या निर्णयामुळे आता भारतीय वस्तूंवर असलेले एकूण शुल्क 50 टक्के इतके झाले आहे.
भारतावरील वाढलेल्या शुल्कामुळे भारताच्या निर्यातीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका डायमंड कटींग व ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग, ऑटो पार्ट्स, टेक्स्टाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स सारख्या उद्योगांना बसू शकतो. स्टील, केमिकल आणि फार्मा उद्योगांनाही मोठा फटका बसू शकतो, ज्यामुळे त्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागू शकतो.
हे ही वाचा !
अमेरिकेने भारतातून होणाऱ्या रत्न व दागिन्यांच्या निर्यातीवर लावलेली आयात टॅरिफ मोठ्या आर्थिक धक्क्याचं कारण ठरली आहे. २७ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणाऱ्या या नव्या निर्णयानुसार कट आणि पॉलिश केलेले हिरे, प्रयोगशाळेत तयार झालेले हिरे, सोने, चांदी, प्लॅटिनम आणि बनावट दागिने यांसह विविध दागदागिने वस्तूंवर ५० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क आकारले जाणार आहे. यापूर्वी या वस्तूंवर वस्तूनिहाय ० ते १३.५ टक्क्यांपर्यंत शुल्क आकारले जात होते.
हे ही वाचा !
या पार्श्वभूमीवर कामा ज्वेलरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. कॉलिन शहा म्हणाले, “या परिस्थितीमुळे रोजगारावर मोठा परिणाम होणार असून पुढील ४–५ महिन्यांत अंदाजे १.२५ लाख नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. यामुळे मुंबई आणि सूरत येथील डायमंड कटींग व ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करणारे कामगार सर्वात जास्त प्रभावित होतील. हे दंडात्मक टॅरिफ भारतीय रत्न व दागिने क्षेत्रासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.याचा परिणाम केवळ निर्यातीवरच नव्हे तर रोजगार व भारताच्या जागतिक स्पर्धाशक्तीवरही होणार आहे.