भारत आणि अमेरिकेत अनेक वर्षांपासून चांगले संबंध आहेत. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारताच्या दाैऱ्यावर आहेत. पुतिन भारतात पोहोचताच अमेरिकेत मोठी खळबळ उडाली. पुतिन हे अचानक भारत दाैऱ्यावर पोहोचल्याने अमेरिकेला मोठा धक्का बसलाय.
अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी त्यांच्या वैयक्तिक फोनवरून येमेनमधील आगामी लष्करी कारवाईशी संबंधित संवेदनशील माहिती शेअर करण्यात आली. ज्यामुळे अमेरिकन सैन्यावरील धोका वाढला आहे. पेंटागॉनच्या महानिरीक्षकांच्या अहवालात ही बाब पुढे आली. हेगसेथने सिग्नल अॅपद्वारे दहशतवाद्यांवर अमेरिकन लष्करी हल्ल्याची योजना शेअर केली.
अहवालात स्पष्टपणे म्हणण्यात आले की, हेगसेथने शत्रूच्या प्रदेशात असलेल्या अमेरिकन लढाऊ विमानांबद्दल गोपनीय माहिती यासोबतच ते कुठे आहेत आणि वेळेची संपूर्ण माहिती त्यांच्या ऑपरेशनच्या दोन ते चार तास अगोदर शेअर केली.
यावर हेगसेथने म्हटले की, कोणतीही गोपनीय माहिती शेअर करण्यात आली नाही. मी पूर्णपणे निर्दोष आहे. यासह, हे प्रकरण बंद झाले आहे. बॉम्बहल्ला करण्यात आला. मात्र, या प्रकारामुळे अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे. पुतिन यांच्या भारत दाैऱ्यादरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेमके काय बोलतात याकडे सर्वांच्या नजरा आहेत.