जगातील अनेक देश रशियाकडून तेलाची खरेदी करतात. आता अशा देशांवर कठोर कारवाई करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका नवीन विधेयकाला मंजुरी दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे.
रशियाकडून थेट कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर ट्रम्प यांनी लगाम खेचण्याचा प्रयत्न केला आहे.हे देश एकप्रकारे तेल खरेदी करून रशियाला आर्थिक रसद पोहचवत असल्याचा आरोप ट्रम्प प्रशासनाने केला आहे. या हिटलिस्टवर भारत, चीन आणि ब्राझील हे देश आहेत.
परदेशी माध्यमांच्या अहवालात अमेरिकेचे सीनेटर लिंडसे यांनी मोठी माहिती दिली आहे. त्यानुसार अमेरिकेत द्विपक्षीय विधेयक मंजूर झाले आहे. ज्याचा वापर भारत, चीन आणि ब्राझील या देशांवर दबाव आणण्यासाठी करण्यात येणार आहे. या विधेयकानुसार या देशांना दंडित करण्यात येणार आहे. युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी आता या देशांवर भारी भक्कम दंड आकारण्यात येणार आहे.
या देशांवर ५०० टक्के कर लादण्यात येणार आहे. ग्राहम यांनी संकेत दिले की पुढील आठवड्याच्या सुरुवातीला हे विधेयक मंजूर होईल. त्यासाठी मतदान होणार आहे.लिंडसे ग्राहम यांनी त्यांच्या एक्स हँडलवर याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार ट्रम्प यांनी रशियावरील प्रतिबंध विधेयकाला मंजूरी दिली आहे.