चीनचे माजी कृषीमंत्री टांग रेनजियान यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलीय. ही शिक्षा दोन वर्षांच्या मुदतवाढीसह देण्यात आली आहे, म्हणजेच त्यांच्या वर्तनावर अवलंबून पुढे ही शिक्षा आजीवन कारावासात बदलली जाऊ शकते. चीनच्या ईशान्य जिलिन प्रांतातील चांगचुन न्यायालयाने रविवारी, 28 सप्टेंबर 2025 रोजी, या शिक्षेची घोषणा केली.

आता चीनने दोन उच्च लष्करी अधिकाऱ्यांसह सात अधिकाऱ्यांना बडतर्फ केले. यामध्ये जनरल हे वेइडोंग आणि नेव्ही अॅडमिरल मियाओ यांचा समावेश आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना सैन्य आणि कम्युनिस्ट पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. 2023 मध्ये सुरू झालेल्या राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेअंतर्गत ही सर्वात महत्त्वाची कारवाई मानली जाते.
हे वेइडोंग हे चीनच्या सेंट्रल मिलिटरी कमिशन (सीएमसी) चे उपाध्यक्ष होते, जे पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) मधील दुसरे सर्वोच्च पद आहे. या कमिशनकडे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली लष्कराची सर्वोच्च कमांड आहे. मार्च 2025 पासून ते सार्वजनिक ठिकाणी दिसले नव्हते. अॅडमिरल मियाओ हे नेव्ही अॅडमिरल आणि लष्करातील माजी सर्वोच्च राजकीय अधिकारी होते. त्यांना जूनमध्ये सीएमसीमधून काढून टाकण्यात आले होते आणि नोव्हेंबर 2023 पासून त्यांची चौकशी सुरू होती. हे वेइडोंग हे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे जवळचे सहकारी मानले जातात.
पाच इतर निलंबित अधिकारी
हे होंगजुन (माजी वरिष्ठ पीएलए अधिकारी)
वांग शिउबिन (सीएमसी जॉइंट ऑपरेशन्स कमांड सेंटर)
लिन झियांगयांग (माजी पूर्व थिएटर कमांडर)
पीएलए आणि नौदलाचे दोन माजी राजकीय कमिसार (नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत)