दुर्दैवी घटना : बस बोगद्याच्या भिंतीला धडकल्याने 14 ठार, 37 जखमी
दैनिक भ्रमर
अपघाताची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. उत्तर चीनच्या शांक्सी प्रांतात मंगळवारी प्रवासी बस बोगद्याच्या भिंतीवर आदळली, त्यात 14 जण ठार आणि 37 जण जखमी झाले, असे चीनच्या राज्य माध्यमांनी बुधवारी सांगितले.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात दुपारी 2:37 वाजता (0637 GMT) हुबेई एक्स्प्रेसवेवर झाल्याची माहिती आहे. अनेक लोकांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.