युद्ध थांबवण्याचं श्रेय पाकिस्तानला , ट्रम्पनी शत्रूराष्ट्राचे आभार मानणे ही मोदींना मारलेली चपराक; संजय राऊत यांची जोरदार टीका
युद्ध थांबवण्याचं श्रेय पाकिस्तानला , ट्रम्पनी शत्रूराष्ट्राचे आभार मानणे ही मोदींना मारलेली चपराक; संजय राऊत यांची जोरदार टीका
img
वैष्णवी सांगळे
इराणसारखा देश हा इस्रायल आणि अमेरिकेला शरण गेला नाही. ३५ दिवसांपेक्षा जास्त काळ अमेरिकेला आणि इस्रायलला इराणने झुंजवत ठेवलं आणि या दोन देशांबाबत जी भीती होती ती इराणने मोडून काढली. देशासाठी कसं लढावं? राज्यकर्त्यांनी बलिदान कसं करावं हे इराणने जगाला दाखवून दिलं. इराणचं नुकसान झालं. पण त्यापेक्षा जास्त नुकसान इस्रायलचं झालं. त्यांनी डोनाल्ड ट्रम्पसारख्या एका झुंड राष्ट्र प्रमुखाला धडा शिकवला असं म्हणत संजय राऊत यांनी इराणचं समर्थन केलं आहे आणि इस्रायल तसंच अमेरिकेवर टीका केली आहे.

पाकिस्तानने इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबवून पाकिस्तानने जगामध्ये शांततेचा संदेश दिला आहे. हे श्रेय आमच्या महाविश्वगुरुंना का मिळालं नाही? कारण महाविश्वगुरुंना कोणतीच भूमिकाच नाही. तिकडे जगात युद्ध सुरु (Iran America War) आहे आणि आमचे महाविश्वगुरु पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, येथे आपल्या राजकीय विरोधकांवर तोंडातून बॉम्ब टाकत होते, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. इराण-अमेरिका युद्ध थांबल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन करुन पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे आभार मानले. डोनाल्ड ट्रम्प हे आपले शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानला थँक क्यू म्हणत असतील तर नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 

इराण-अमेरिकेचं युद्ध थांबवण्याचं श्रेय चीन आणि पाकिस्तानने घेतलं. शांततेच्या संदर्भातली बैठक इस्लामाबादला होणार आहे. जे इस्लामाबाद ऑपरेशन सिंदूरमध्ये ताब्यात घेणार होतात, भाजपाचा झेंडा फडकवणार होतात तिथे आता ट्रम्प, नेत्यानाहू, इराणचे नेते बसून शांतीची चर्चा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आणि भारतासाठी ही लाजिरवाणी बाब आहे. पाकिस्तानला जी प्रतिष्ठा यामुळे मिळाली त्याला जबाबदार मोदी आहेत. डोनाल्ड पाकिस्तान आणि चीनला थँक्यू म्हणत असतील तर भारताला आणि मोदींना मारलेली ही चपराक आहे. मोदींनी आता सत्तेवर राहता कामा नये असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group