नवी दिल्ली (भ्रमर वृत्तसेवा) :- चीनमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. अचानक जमीन हादरल्याने शेकडो इमारतींची पडझड झाली. या विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 111 चिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
चीनच्या वायव्येकडील गासू प्रांतात हा भूकंप झाला आहे. घरांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. युरोपीयन भूमध्य भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली.
तर त्याची खोली अंदाजे 10 किलोमीटर इतकी होती. भूकंपामुळे चीनच्या गांसू-किंघाई सीमावर्ती भागातील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. याठिकाणी मृतांची संख्या देखील जास्त आहे.