नेपाळ पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; 4.5 तीव्रतेचे जाणवले धक्के
नेपाळ पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; 4.5 तीव्रतेचे जाणवले धक्के
img
Dipali Ghadwaje
3 नोव्हेंबर रोजी झालेल्या 6.4 तीव्रतेच्या भूकंपातून सावरत असतांनाच नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मकवानपूर जिल्ह्यातील चितलांग येथे 4.5 तीव्रतेचा भूकंप जाणवला. आज पहाटे हे हादरे बसले. भूकंपात अद्याप कुठेही मोठी हानी झाली नसल्याचे समोर आले आहे. 

या महिन्याच्या सुरुवातीला 3 नोव्हेंबर रोजी नेपाळमध्ये 6.4 तीव्रतेच्या भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. ज्यामध्ये मोठी जीवितहानी आणि वित्तहानी देखील झाली होती. शेकडो लोकांचा त्यात मृत्यू देखील झाला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मकवानपूर जिल्ह्यातील चितलांग येथे 4.5 तीव्रतेचा भूकंप जाणवला. आज पहाटे हे हादरे बसले असल्याची माहिती आहे. त्यामुळे आज बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे समस्या आणखी वाढली आहे.

भारताकडून मदत
भारताने 6.4 तीव्रतेच्या भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांना आपत्कालीन मदत पॅकेज पाठवले होते. ज्यात वैद्यकीय उपकरणे, मदत सामग्री आणि बरेच काही समाविष्ट होते. भारताने भूकंपग्रस्त समुदायांना मदत करण्यासाठी आवश्यक औषधे आणि मदत साहित्य पाठवले. तीव्र भूकंपानंतर नवी दिल्ली आणि उत्तर भारताचा काही भागही हादरला होता. या भूकंपात नेपाळमधील 157 लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group