मोठी दुर्घटना ! भूस्खलनामुळे दोन बस नदीत वाहून गेल्या,  चालकासह 7 भारतीयांचा मृत्यू ; 'इतके' प्रवासी बेपत्ता
मोठी दुर्घटना ! भूस्खलनामुळे दोन बस नदीत वाहून गेल्या, चालकासह 7 भारतीयांचा मृत्यू ; 'इतके' प्रवासी बेपत्ता
img
Dipali Ghadwaje
नेपाळमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. शेजारील देशात भूस्खलनामुळे दोन बस नदीत वाहून गेल्या आहेत. या अपघातात सात भारतीयांचा मृत्यू झाला आहे. तर, बसमध्ये प्रवास करणारे सर्व प्रवासी बेपत्ता आहेत. अपघाताची तीव्रता लक्षात घेता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

खराब हवामान नेपाळमधील लोकांसाठी समस्या बनले आहे. आज म्हणजेच शुक्रवारी सकाळी मध्य नेपाळमधील मदन-आशीर महामार्गावर भूस्खलनामुळे सुमारे 63 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या दोन बस त्रिशूली नदीत वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व बेपत्ता असल्याची नोंद आहे. 

दरम्यान, खराब हवामानामुळे काठमांडू ते भरतपूर, चितवन येथील सर्व उड्डाणे आजसाठी रद्द करण्यात आली आहेत. जिल्हा दंडाधिकारी म्हणाले की स्थानिक प्रशासन आणि मदत कर्मचारी घटनास्थळी आहेत आणि शोध मोहीम सुरू आहे. संततधार पावसामुळे बेपत्ता बसेसच्या शोधात अनेक आव्हाने समोर येत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group