देशभरात अलर्ट ! जैश ए मोहम्मदचे ३ दहशतवादी भारतात घुसले
देशभरात अलर्ट ! जैश ए मोहम्मदचे ३ दहशतवादी भारतात घुसले
img
वैष्णवी सांगळे
पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचे तीन आतंकवादी नेपाळ मार्गे भारतात घुसले आहेत. बिहार पोलिस मुख्यालयाने या तिन्ही दशतवाद्यांची फोटो आणि नाव जारी केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील बहावलपुरचा रहिवासी मोहम्मद उस्मान, उमरकोटचा रहिवासी आदिल हुसैन, रावलपिंडीचा रहिवासी हसनैन अली अवान अशी तिघांची नावे आहेत. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे तिघेही काठमांडू पोहोचले होते. त्यानंतर ते बिहार मार्गे भारतात घुसले आहेत.

हे ही वाचा 

तिन्ही दहशतवाद्यांच्या पासपोर्टशी संबंधित माहितीही देण्यात आली आहे. ते तिघेही ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यातच काठमांडूला पोहोचले होते. तेथून ते बिहारमध्ये घुसल्याचे सांगण्यात आले. या वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सुरक्षिततेची खबरदारी म्हणून पोलीस मुख्यालयाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

हे ही वाचा 
दुर्दैवी ! मराठा मोर्चादरम्यान मनोज जरांगेंच्या सहकाऱ्याचा मृत्यू

हे तिघेही दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचे दहशतवादी आहेत. सध्या बिहारसोबतच संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे तर महाराष्ट्रामध्ये गणपतीच्या आगमन झाले आहे. तिन्ही दहशतवादी हे मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आल्याची माहिती मिळत आहे. सध्या या तिन्ही दहशतवाद्यांना शोधण्याचे काम सुरू आहे. तिघांचेही फोटो व्हायरल करण्यात आली आहेत, सोबतच हे कुठेही दिसली तर संपर्क करण्यासाठी काही नंबर देखील जारी करण्यात आली आहेत.

हे ही वाचा 
हृदयद्रावक ! काळरात्र ठरली, इमारत दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू

नेपाळमार्गे यापूर्वीही पाकिस्तानी आणि पाकिस्तानस्थित संशयित दहशतवाद्यांनी बिहारमध्ये घुसखोरी केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. गेल्या वर्षी ५ सप्टेंबरला नेपाळ सीमेजवळील भागलपूरच्या बरहपुराचा रहिवासी सद्दाम याला बनावट नोटांसह अटक केली होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group