नितीश कुमार १० व्यांदा बनले मुख्यमंत्री ,  'या' नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
नितीश कुमार १० व्यांदा बनले मुख्यमंत्री , 'या' नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
img
वैष्णवी सांगळे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज बिहारमध्ये नितीश कुमार यांनी रेकॉर्ड 10 व्यां दा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश यांच्या नव्या मंत्रिमंडळात २६ मंत्र्यांचा समावेश झाला आहे. 

या नेत्यांनी घेतली शपथ 
नव्या सरकारमध्ये एनडीएचा घटक दलात भाजपच्या कोट्यातून सर्वाधिक 17 आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. जनता दल यूनायटेडमध्ये 15 मंत्री बनले.सम्राट चौधरी , विजय सिन्हा यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. सम्राट आणि विजय सलग दुसऱ्यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री बनले आहेत. भाजपच्या कोट्यातून मंत्री बनणाऱ्यांमध्ये सम्राट चौधरी आणि विजय सिन्ह ही प्रमुख नावे आहेत. त्याशिवाय श्रेयसी सिंह, राम निषाद, सुरेंद्र मेहता, मंगल पांडे, नितिन नवीन, नारायण शाह, राम कृपाल, संजय टायगर, प्रमोद चंद्रवंशी, अरुण शंकर प्रसाद आणि दिलीप जैस्वाल ही नावं आहेत. 

कोण-कोण मंत्री बनणार?
नव्या सरकारमध्ये कॅबिनेटबद्दल जी सहमती झालीय त्यानुसार, भाजपकडे स्पीकरशिवाय 17 मंत्रीपदं असतील. जेडीयूच्या कोट्यातून 15 मंत्री आहेत. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ति पार्टी (राम विलास पासवान) यांचे दोन, तर जीतन राम मांझी (HAM) आणि उपेंद्र कुशवाह यांच्या पार्टीचा (RLM) प्रत्येकी एक आमदार मंत्री बनेल. नितीश शिवाय सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी भाजपच्या कोट्यातून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
bihar |
इतर बातम्या
Join Whatsapp Group