ऐकावं ते नवलंच ! चिमुकल्याने नागाचा घेतला चावा, नागाचा मृत्यू
ऐकावं ते नवलंच ! चिमुकल्याने नागाचा घेतला चावा, नागाचा मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
नाग पाहिला आणि भीती वाटली नाही अशी क्वचितच लोक पहायला मिळतात. नागाच्या एका दंशाने माणसाचा मृत्यू होऊ शकतो. त्याचं विष इतकं विषारी असतं. पण एका चिमुकल्याने नागाला दंश केल्याने नागाचाच मृत्यू झाल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हो, हे खरं आहे. 

बिहारमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे.पश्चिम चंपारण जिल्ह्यातील मझौलिया ब्लॉकमधील मोहाची बंकटवा गावात ही घटना घडली.  बिहारमधील सुनील साह यांचा एक वर्षाचा मुलगा गोविंदा शुक्रवारी दुपारी त्यांच्या घरात खेळत होता. त्या मुलाची आजी मातेश्वरी देवी यांनी सांगितले की, याच दरम्यान घरात दोन फूट लांबीचा नाग बाहेर आला. मुलाने नागाला खेळणे समजून पकडले. नंतर त्याने त्याला दातांनी चावले. धक्कादायक म्हणजे त्यानंतर काही वेळातच नागाचा मृत्यू झाला. 

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून कारवाई, आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

मुलाने नागाला चावून त्याचेही दोन तुकडे केल्याचे सांगण्यात येत आहे. नागाला चावल्यानंतर काही तासांनी तो मुलगाही बेशुद्ध पडला.डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाला विषबाधेची कोणतीही लक्षणे नाहीत. मुलाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

bihar | Child |
इतर बातम्या
Join Whatsapp Group