ब्लू प्रिंटचा प्रश्न अन मैथिली ठाकूरचं अनपेक्षित उत्तर… उत्तरामुळे व्हायरल झालेली मैथिली निवडणुकीत आघाडीवर की पिछाडीवर?
ब्लू प्रिंटचा प्रश्न अन मैथिली ठाकूरचं अनपेक्षित उत्तर… उत्तरामुळे व्हायरल झालेली मैथिली निवडणुकीत आघाडीवर की पिछाडीवर?
img
वैष्णवी सांगळे
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आज या या निवडणुकांचा निकाल आहे. आतापर्यंतचे जे कल हाती आले आहेत, त्यानुसार भाजप आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यात काँटे की टक्कर पहायला मिळत आहे. 



बिहार निवडणुकीत काही मतदारसंघातील लढती विशेष चर्चेत आहेत. दरभंगामधील अलीनगरची सीट यापैकीच एक आहे. अलीनगरमधून भाजपने गायिका मैथिली ठाकूरला निवडणूक रिंगणात उतरवलं आहे. 

मैथिली ठाकूर निवडणूक लढवत असलेल्या अलीनगरच्या निकालाकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. भाजपने या ठिकाणाहून मैथिली ठाकूरला निवडणूक रिंगणात उतरवून ही जागा हाय-प्रोफाइल बनवली. ६ नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात येथे मतदान झालं होतं. निकालाचे प्राथमिक कल आलेत त्यानुसार अलीनगरमधून मैथिली ठाकूर आघाडीवर आहे.

'तो' प्रश्न आणि मैथिलीचा गैरसमज 
काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नामुळे मैथिली ठाकूर हे नाव देशभरात आणखी चर्चेत आलं. पत्रकाराने मैथिली ठाकूर यांना मतदारसंघाच्या ब्लू प्रिंटबद्दल प्रश्न विचारला. पण त्यांना तो फिल्म बद्दल विचारतोय असं वाटलं. त्यावर मैथिली यांनी ‘मी हे सर्वांसोबत कसं शेअर करू? ही पूर्णपणे वैयक्तिक आणि गोपनीय बाब आहे’ असं उत्तर दिलं. या उत्तराचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यामुळे मैथिली ठाकूर यांना अजून प्रसिद्धी मिळाली.
bihar |
इतर बातम्या
Join Whatsapp Group