मोहनिया पोलिस स्टेशन परिसरात आग, घटनेत दुचाकी जळून खाक
मोहनिया पोलिस स्टेशन परिसरात आग, घटनेत दुचाकी जळून खाक
img
Dipali Ghadwaje
बिहारमधील कैमुर जिल्ह्यात मोहनिया पोलिस स्टेशन परिसरात आग लागल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी उशिरा रात्री आग लागली. आगीची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. काही वेळाने आग आटोक्यात आली अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी कुंदन कुमार यांनी दिली. आग नेमकी कशी लागली याचा शोध घेण्यात येत आहे. सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही.  

मिळालेल्या माहितीनुसार, मोहनिया पोलिस स्टेशनच्या कॅम्पसमध्ये आग लागली. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये जप्त केलेल्या अनेक बाईक आणि स्कूटी या आगीत जळून खाक झाल्या. 

आगीमुळे परिसरात धुरांचे लोट पसरले आहे. अग्निशनच्या दोन ते तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग सर्किटमुळे लागली आणि ती वेगाने पसरली.

आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगीनंतर घटनास्थळी कुलींगचे काम सुरु होते. अग्निशमन दलाच्या अथाक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली. आगीत बराच दुचाकी  जळून खाक झाल्या होत्या.

इतर बातम्या
Join Whatsapp Group