मागील काही दिवसांपासून मुंबईत सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांची चांगलीच दमछाक होत आहे. चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत एका दुमजली घराला रविवारी (ता. ६) भीषण आग लागली होती. या आगीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. दरम्यान, चेंबूरमधील आगीची ही दुर्दैवी घटना ताजी असतानाच आता मुंबईच्या माहीम परिसरात देखील आगीची घटना घडली.
मुंबईतील माहीम परिसरात असलेल्या एका रहिवासी इमारतीला आज सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्याचं कळताच इमारतीतील रहिवाशांनी तातडीने बाहेर धाव घेतली. मात्र, आगीचा भडका उडाल्याने काहीजण इमारतीत अडकून पडल्याची माहीती आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून सध्या आगीवर नियंत्रण मिळवणे सुरु आहे. आगीमुळे परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरले आहेत.
मोईन हाइट्स नावाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आज सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्याचं कळताच इमारतीतील रहिवाशांनी तातडीने बाहेर धाव घेतली. मात्र, क्षणार्धात आगीचा भडका उडाल्याने काहीजण इमारतीत अडकून पडले आहेत.
दरम्यान आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे. आगीमुळे परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.