मोठी बातमी! काँग्रेसला बसणार मोठा धक्का? बडा नेता भाजपच्या गळाला?
मोठी बातमी! काँग्रेसला बसणार मोठा धक्का? बडा नेता भाजपच्या गळाला?
img
Dipali Ghadwaje
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला, महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. महायुतीचं सरकार राज्यात पुन्हा एकदा स्पष्ट बहुमतानं सत्तेतआलं,  राज्यात महायुतीचे तब्बल 232 उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं. भाजप विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला.

दरम्यान विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीला गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे, अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. पक्षांना लागलेली गळती ही महाविकास आघाडीसाठी डोकेदुखीचा विषय ठरली आहे. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे, मात्र आता काँग्रेसमधील काही नेते देखील महायुतीमध्ये प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
 
पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात, मात्र त्यापूर्वीच काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , 2 दिवसांपूर्वी कैलास गोरंट्याल यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेसचे नेते कैलास गोरंट्याल  पक्षावर नाराज आहेत. कैलास गोरंट्याल भाजप पक्षप्रवेशावर थेट बोलत नसले, तरी भाजप पक्षप्रवेशाबाबत नकार ही देत नाहीत.

त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. कैलास गोरंट्याल यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाल्यास जालना जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.

‘आईना बनने का, हरजाना भरना है मुझे, कब का तूट चुका था मै,बस अब निखरना है मुझे. ये बता दे साले दिलेरे कब तक इम्तिहान देना है मुझे’ अशा शब्दात माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी शेरोशायरी केली आहे. यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला आला उधाण आलं आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group