मोठी बातमी ! मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी
मोठी बातमी ! मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी
img
वैष्णवी सांगळे
एक मोठी बातमी समोर आली आहे. कुडाळ न्यायालयाने भाजपच्या तीन नेत्यांना चांगलाच दणका दिलाय. काही वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात संविधान बचाव आणि ओबीसी आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनाशी संबंधित एका प्रकरणात कुडाळ न्यायालयाने काही बड्या नेत्यांना मोठा दणका दिला आहे

राज्याचे कैबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना कुडाळ न्यायालयाने मोठा धक्का दिला असून राणे यांच्यावर अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यासोबतच संविधान बचाव आंदोलन केल्याप्रकरणी आमदार प्रविण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांना देखील अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 


सिंधुदुर्ग जिल्ह्यात 26 जून 2021 रोजी झालेल्या ओबीसी आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी कुडाळ पोलीस स्थानकात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.सिंधुदुर्गात राजन तेली यांच्यासह आमदार निलेश राणे, मंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य ४२ जणांवर आंदोलन प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. 
त्याप्रकरणी, न्यायालयात आज झालेल्या सुनावणीस आमदार निलेश राणे आणि राजन तेली तसेच अन्य आरोपी उपस्थित होते. मात्र, नितेश राणे यांच्यासह अन्य ५ जण गैरहजर होते. 

मंत्री नितेश राणे वारंवार न्यायालयाच्या तारखांना गैरहजर राहिल्याने न्यायालायाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. दरम्यान, न्यायालयाने अनुपस्थित राहिलेल्या नितेश राणे यांच्या वकिलांचा विनंती अर्ज नाकारला आहे. त्यामुळे, मंत्री महोदयांना कोर्टाकडून दणका देण्यात आला आहे.  


इतर बातम्या
Join Whatsapp Group