भाजपची मोठी खेळी, बड्या नेत्याची भाजपात एन्ट्री
भाजपची मोठी खेळी, बड्या नेत्याची भाजपात एन्ट्री
img
वैष्णवी सांगळे
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वारे जोरदार वाहत असताना भाजपने मोठी खेळी खेळलीय. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीला मोठा झटका बसला आहे. काही प्रमुख नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.


अकोल्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला मोठा झटका बसला आहे. महापालिकेत २०१२ आणि २०१७ असे सलग दोनदा नगरसेवक असलेल्या बबलू जगताप यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजप मध्ये प्रवेश केला आहे. 

काल त्यांचा अधिकृतरित्या अमरावतीमध्ये भाजप पक्षात प्रवेश झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या विभागीय मेळाव्यात हा प्रवेशसोहळा पार पडला. या पक्ष प्रवेशामुळे काही कार्यकर्तेही उपस्थितीत होते.

जगताप हे १० वर्ष जठारपेठ-लहान उमरी भागातून विजयी विजयी झालेले आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशाने या भागात भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच जगताप यांच्या पक्षप्रवेशामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.


BJP |
इतर बातम्या
Join Whatsapp Group