माजी खासदार डाॅ. हिना गावित यांनी केला ‘या’ पक्षात प्रवेश
माजी खासदार डाॅ. हिना गावित यांनी केला ‘या’ पक्षात प्रवेश
img
वैष्णवी सांगळे
विधानसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा – धडगाव मतदार संघातून उमेदवारी न मिळाल्याने बंडाचा झंडा फडकावित अपक्ष उमेदवारी करणाऱ्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी आज मुंबई येथील कार्यक्रमात भाजपमध्ये घरवापसी केली आहे. 


अनेक दिवसांपासून डाॅ. हिना गावित या भाजपबरोबर अनधिकृतरित्या काम करत असल्या तरी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या त्यांच्या घरवापसीमुळे नंदुरबार जिल्ह्यात भाजपची ताकद अधिक बळकट होणार आहे. यावेळी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित देखील उपस्थित होते.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेर मंगळवारी त्यांचा भाजपमध्ये पुन्हा प्रवेश झाला आहे. हिना गावित या अभ्यासू, हुशार आणि नरेंद्र मोंदी, अमित शाह यांच्या मर्जीतील नेत्या मानल्या जातात. तरुण पिढीतील हे अभ्यासू नेतृत्व असल्याने त्या खासदार असतांना त्यांच्याकडे राष्ट्रीय प्रवक्ता पदाची देखील धुरा होती. आता त्यांचा भाजपमध्ये पुन्हा प्रवेश झाल्यावर त्यांच्यावर पक्ष कोणती जबाबदारी टाकणार, हे पाहणे महत्वपूर्ण ठरेल.
BJP |
इतर बातम्या
Join Whatsapp Group