कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील राडा प्रकरणात गणपत गायकवाडांसह चार निर्दोष
कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील राडा प्रकरणात गणपत गायकवाडांसह चार निर्दोष
img
वैष्णवी सांगळे
२०१४ मध्ये कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात झालेल्या राडा प्रकरणात एक महत्त्वाचा निकाल समोर आला आहे.२०१४ मध्ये कोळसेवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये झालेल्या राड्याच्या प्रकरणात भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात कल्याण न्यायालयानं सुनावणी करताना गणपत गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख निलेश शिंदे यांच्यासह पाच जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.

सीबीआयकडून नाशिकमध्ये दोन बेकायदेशीर कॉल सेंटर्स उध्वस्त

२०१४ साली कोळसेवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. माजी आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना पदाधिकारी निलेश शिंदे यांच्यासह पाच जणांवर राडा घातल्याचा आरोप होता. त्यावेळी गणपत गायकवाड हे अपक्ष आमदार होते, तर निलेश शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते.

... तर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नका; ओबीसी उपसमितीत निर्णय

पोलिसांनी या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी स्वत: गुन्हा नोंदवून आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केले होते. मात्र, पुराव्यांअभावी कल्याण कोर्टानं गणपत गायकवाड, निलेश शिंदेसह पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सध्या गणपत गायकवाड आणि कुणाल पाटील हे उल्हासनगरमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणात अटकेत आहेत.


इतर बातम्या
Join Whatsapp Group