... तर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नका; ओबीसी उपसमितीत निर्णय
... तर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नका; ओबीसी उपसमितीत निर्णय
img
वैष्णवी सांगळे
ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी उपसमितीची बैठक संपन्न झाली. यात विविध विषयावर विषयांवर चर्चा झाली. या बैठकीत एकूण १८ ते १९ विषयांवर चर्चा झाल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यात मराठ्यांना देण्यात येणाऱ्या कुणबी प्रमाणपत्राबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. 

मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट देताना पुराव्यांवर कोणतीही खाडाखोड नको, ओव्हर राईटिंग नको , खाडाखोड झालेले कागदपत्रं ग्राह्य धरू नये आणि त्यावर प्रमाणपत्र वाटप करू नये असा महत्त्वाचा निर्णय ओबीसी उपसमितीच्या बैठकीत झाला आहे. 

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 'हे' मोठे गिफ्ट

पुरावे सादर करताना खोडतोड कशी होते असे पुरावे आज दाखविले गेले. त्यामुळे चुकीच्या पुराव्यांवर, खोट्या पुराव्यांवर सर्टीफीकेट देऊ नये अशी मागणी करण्यात आली. ओबीसींचा निधी मिळावा ओबीसी महामंडळांसाठी ३२०० कोटी रूपये जे जाहीर झाले आहेत ते पैसे मिळावेत अशी मागणी करण्यात आली.

ओबीसी समाजासाठी असलेली कोणतीही विशेष शिष्यवृत्ती बंद पडू नये, होस्टेल सगळ्या ठिकाणी असावे, ओबीसीचे विभागीय कार्यालय असावे अशीही मागणी यावेळी करण्यात आली. मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समिती नेमण्यात आली. तसेच आता खोट्या नोंदी होतं आहे ते पाहण्यासाठी एक समिती नेमण्यात यावी अशी आमची मागणी आहे असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. 



इतर बातम्या
Join Whatsapp Group