मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याचं आम्हाला घेणं देणं नाही - मनोज जरांगे पाटील
मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याचं आम्हाला घेणं देणं नाही - मनोज जरांगे पाटील
img
DB
मनोज जरांगे यांना अगांवर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, अशी संतप्त प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळ नाराज  असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. अशातच भुजबळ यांना डावलण्यात आलं, यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. 

छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही, हा आमचा प्रश्न नसून, मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याचं आम्हाला घेणं देणं नसल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच त्यांनी उपोषणाचाही इशारा दिला.

नागपुरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. दरम्यान, मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत. १७ डिसेंबरला मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार असून, या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील सामूहिक आमरण उपोषणाला बसण्याची तारीख जाहीर करणार आहेत.

तसेच ज्यांना स्व:इच्छेने सामूहिक आमरण उपोषणाला बसायचं, त्यांनाच उपोषणाला बसवलं जाईल असं देखील जरांगे पाटील म्हणाले. उपोषणाला बसण्यासाठी कोणाला बंधन घालण्यात येणार नाही. सामूहिक उपोषणाला जर कुणी नाही बसलं तरी मी बसणार असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले. उपोषणाला बसा म्हटलं तर घरा घरांतून मराठे उपोषणाला बसतील. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group