आज दिवसभरात झालेल्या दोन पत्रकार परिषदा आरोप प्रत्यारोपाने गाजल्या. आज सकाळी मनोज जरांगे पाटील तर दुपारी धनंजय मुंडे यांची पत्रकार परिषद झाली यात दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरोधात धुवांधार बॅटिंग केल्याचं पहायला मिळालं.
धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येचा कट रचला आणि त्यासाठी अडीच कोटींची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर दुपारी धनंजय मुंडे यांनी जरांगे यांच्या आरोपांना प्रत्यत्तर दिलं.
धनंजय मुंडे नक्की काय म्हणाले ?
मुख्यमंत्र्यांची आयमाय काढायची. भुजबळांची आयमाय काढायची. आमचा तर जपच आहे. पंकजा ताईंना काहीही बोलायचं. घरात इंग्रज आले होतो का. ही का पद्धत आहे का बोलायची. आपल्या आयबहिणीला बोलल्यावर राग येणार नाही का. आम्ही राग गिळलाय. आम्ही गप्प बसलो. कारण मराठा आरक्षण मराठ्यांना मिळालं पाहिजे, अशी आमची भूमिका होती.
माझ्यापासून संमद्या पृथ्वीतलाला धोका आहे असं समजा. मी काय कोव्हिड व्हायरल झालो काय आता. एका मंत्र्याला माझ्यासापासून धोका असल्याचे काही बोलत आहेत. ऑन एअर ते संवैधानिक पदावरील मुख्यमंत्र्यापासून उपमुख्यमंत्र्यांपासून मंत्र्यांपर्यंत ऑन एअर कुणाचीही आयमाय काढतात. सरकार काही करत नाहीत. आम्ही काय एवढे बुळे नाहीत. या सर्व गोष्टी न समजायला अशी टीका त्यांनी सरकारवर केली.
मुख्यमंत्र्यांना वाईट वाटेल. पण इथली पोलीस यंत्रणा कोणत्याही जाती धर्माचे असो यांना ( मनोज जरांगे ) घाबरून आहे. म्हणूनच कर्ते करवते तेच आहेत. सर्वांचाच टार्गेट धनंजय मुंडे का. एवढ्या जणांना मी आवरला जात नाही का ? कमाल आहे, असा चिमटा त्यांनी काढला.
यावेळी धनुभाऊंनी जरांगेंना एक मोठा इशाराही दिला. म्हणे माझं फोनवर बोलणं झालं. चोवीस तास सुरू असतो. ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे त्या गरीबांना अडचण आली तर ते माझा फोन लावतात. त्यांची अडचण होऊ नये म्हणून मी फोन सुरू ठेवतो. त्यात मला कोणी फोन केला आणि बोलले तर याचा अर्थ त्या अर्थाने बोललो का. त्यांना संपवण्यासाठी बोललो का. या सर्व गोष्टी जरांगे जी महागात पडणार आहे. कर्मा रिपीट. तुम्ही जेवढं खोटं कराल. तेवढं ते मागे फिरेल, असा इशारा मुंडे यांनी जरांगेंना दिला.