धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ! घरगुती हिंसाचारात दोषी, वांद्रे कौंटुबिक न्यायालयाने दिला
धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ! घरगुती हिंसाचारात दोषी, वांद्रे कौंटुबिक न्यायालयाने दिला "हा" निकाल
img
Dipali Ghadwaje
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता करूणा शर्मा या धनंजय मुंडेंच्या पत्नी असल्याचा निर्वाळा कोर्टानं दिला आहे. करूणा शर्मा यांना दरमहा दोन लाख रूपये पोटगी देण्याचे आदेशही कोर्टानं दिलेत. वांद्रे इथल्या कौटुंबिक न्यायालयानं हा निकाल दिलाय.

करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, असं कोर्टाने म्हटलं आहे. तसेच करूणा शर्मा यांना दरमहा 2 लाख पोटगी द्यावी, असे आदेश देखील कोर्टाने दिले आहेत. वांद्रे कौंटुबिक न्यायालयाचा हा निकाल दिला आहे.

कोर्टात नेमकं काय झालं?

करुणा शर्मा यांनी कायदेशीर लढाई दिली होती. करुणा शर्मा यांनी वांद्रे इथल्या कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि घरगुती हिंसाचाराचा आरोप केले होते. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने घरगुती हिंसाचार झाल्याचं मान्य केलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर प्रामुख्याने घरगुती हिंसाचाराचे आरोप होते. दोघे जेव्हा एकत्र होते, त्यावेळी हिंसाचार केल्याची माहिती कोर्टाकडे होती. हे घरगुती प्रकरण असल्याने वांद्रे न्यायलयाने या प्रकरणात होतं. दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला. करुणा शर्मा यांच्याकडून 15 लाखाच्या पोटगीची मागणी केली होती. अखेर युक्तीवाद झाल्यानंतर कोर्टाने करुणा शर्मा यांच्या बाजूने निकाल दिला. आता विभक्त राहिल्यानंतर करुणा शर्मा यांना पोटगी म्हणून 2 लाख इतका खर्च देण्याचा निकाल कोर्टाने दिला आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर पीकविमा योजनेत घोळ्याचा देखील आरोप करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालायने विधानसभा निवडणुकीवेळी शपथपत्रात अनेक बाबींची माहिती दडविल्याचा आरोप करण्यात आला होता. अशातच आता करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढवल्या आहेत.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group