मुंबई (भ्रमर वृत्तसेवा) : मंत्रीपद जाऊन 4 महिने उलटले तरी बंगला न सोडल्याने धनंजय मुंडे यांना दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची रक्कम आता तब्बल 42 लाखांपर्यंत पोहोचली आहे.सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्याने विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती.
हे ही वाचा...
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली. परिणामी धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.धनंजय मुंडे यांनी साडे चार महिन्यांपूर्वी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. पण अद्याप शासकीय निवासस्थान त्यांनी सोडले नसल्याची बाब समोर आली आहे. तर या बंगल्यात वास्तव्यास येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ मंत्री प्रतीक्षेत असल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा...
महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर धनंजय मुंडे यांना सातपुडा बंगला वाटप करण्यात आला होता. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर १५ दिवसांच्या आत सरकारी बंगला रिकामा करणे बंधनकारक असते. धनंजय मुंडे यांनी ४ मार्च रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानुसार त्यांनी २० मार्चपर्यंत बंगला सोडणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी अद्यापही बंगल्याचा ताबा न सोडल्याने त्यांना हा दंड आकारण्यात आला आहे..