२४ डिसेम्बर २०२३
देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. जेएन.1 या नव्या सब व्हेरियंटने देशभरात हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकरने सावध पवित्रा घेत काळजी घेण्याचं आव्हान केले आहे.
राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ते सध्या पुण्यातील मॉडर्न कॉलनीमध्ये असलेल्या घरी कॉरनटाइन आहेत. घरीच त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत.
मागील चार ते पाच दिवसांपासून धनंजय मुंडे यांना खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
नागपूर अधिवेशन संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने मी तपासणी केली असता पुन्हा एकदा कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मला सध्या फारसा त्रास नाही, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने मागील 4 दिवसांपासून क्वारंटाईन राहून योग्य उपचार घेत आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 24, 2023
Copyright ©2024 Bhramar