
५ जुलै २०२५
मूळ शिवसेना मराठी मुद्द्यावर जन्माला आली. त्याच मुद्द्यावर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मेळावा होत आहे. - या मेळाव्याला माझ्या शुभेच्छा आहेत.
मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत. दोन भावांनी एकत्र यावे, अशी लोकांची इच्छा आहे. आम्हाला सुध्दा असे वाटतं की ते एकत्र यावेत, पण असं होणार आहे का? राज ठाकरे का दूर गेले? ते कारण सुटले का? संपले का? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एका कार्यक्रमासाठी एकत्र आले आहेत. निवडणुकांसाठी ते एकत्र येतील का नाही? याची मला काही कल्पना नाही. एकत्र येणे शक्य आहे का? ते येणारा वेळ सांगेल. आता दोघांनी सांगितले आहे आम्ही आमच्या भांडणापेक्षा मराठी मुद्दा जास्त महत्वाचं आहे.
मनापासून एकत्रीत येणं हे वेगळं आहे, ज्या मुद्यावर ते वेगळे झाले ते प्रश्न सुटले का? असे छगन भुजबळ म्हणाले. कदाचित पुढे जाऊन दोघांमधील प्रश्न सुटतील. सभा आणि रॅली पुरता ते एकत्र आले आहेत. पण त्यांचे मनोमिलन झाले पाहिजे. ही लोकांची इच्छा आहे. लोकांची इच्छा आहे ते एकत्र आले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार या विषयवर बोलले. मात्र पवार फॅमिली एकत्र येणार का? या विषयावर बोलण्यास त्यांनी टाळलं.
Copyright ©2025 Bhramar