मी मुंबईत येणारच, हिंमत असेल तर... के आनामलाई यांचे राज ठाकरेंना आव्हान
मी मुंबईत येणारच, हिंमत असेल तर... के आनामलाई यांचे राज ठाकरेंना आव्हान
img
वैष्णवी सांगळे
मुंबई महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर मुंबई महाराष्ट्राची नसल्याचे विधान करून भाजपची अडचण वाढवणाऱ्या के अन्नामलाई यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचा पुनरुच्चार केला आहे. भाजपने यावेळी अनोखी रणनीती आखत इतर राज्यातील भाजप नेत्यांना स्टार प्रचार यादीमध्ये स्थान दिले होते. 

नववीतील मुलीचं भयंकर कृत्य ! रात्री आई-वडिलांना जेवणातून द्यायची गुंगीचं औषध, अन् प्रियकरासोबत...

उत्तरभारतीयांना आकर्षित करण्यासाठी रवी किशन, मैथिली ठाकूर यांना उतरवले आहे तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात दाक्षिणात्य लोक हे स्थायिक असल्याने तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के आनामलाई यांना धारावीमध्ये प्रचारासाठी उतरवले होते. मात्र प्रचारात त्यांनी Bombay is Not A Maharashtra City असे विधान केल्याने राज ठाकरे यांनी त्यांचा कालच्या भाषणात चांगलाच समाचार घेतला होता. मुंबई हे केवळ महाराष्ट्रासाठी सीमित नसून ते आंतराष्ट्रीय दर्जाचे स्थळ आहे. असे म्हटले होते.

यावरच रविवारी झालेल्या ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेमध्ये राज यांनी आनामलाई यांचा चांगलाच समाचार घेतला. यालाच आता आनामलाई यांनी प्रतिउत्तर दिले आहे. राज ठाकरे, आदित्य ठाकरे मला धमक्या देणारे कोण? मला शिवीगाळ करण्यासाठी त्यांनी सभा घेतली. मी मुंबईत आलो तर माझे पाय कापतील, असे काहीनी म्हटले. मी मुंबईत येणारच हिंमत असेल तर पाय कापून दाखवा. मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर आहे असे मी म्हटले. याचा अर्थ मुंबई उभारण्यात महाराष्ट्रीयन लोकांचा काहीच वाटा नाही असा होतो का? हे लोक अडाणी आहेत. असे पलटवार के आनामलाई यांनी ठाकरेंवार केला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group