आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात हिंदी भाषा सक्तीचा निर्णय अखेर मागे घेण्यात आल्याने मराठी भाषिक जनतेसाठी हा एक मोठा विजय मानला जात आहे. याच विजयाचा उत्सव म्हणजे ‘मराठी विजयी सोहळा’, जो आज वरळी डोममध्ये मराठी माणसाच्या साक्षीने साजरा केला जात आहे.
या ऐतिहासिक क्षणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ एकाच मंचावर येऊन मराठी जनतेला संबोधित करणार आहेत. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या सोहळ्याकडे लागले आहे.