नाशिक जिल्ह्यातील
नाशिक जिल्ह्यातील "या" ३ नगरपरिषदांमधील काही प्रभागांत निवडणुकीला स्थगिती
img
दैनिक भ्रमर

नगरपरिषदेच्या सदस्यपदाच्या जागेसाठी अपील करण्यात आले होते. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने नाशिक जिल्ह्यातील तीन नगरपरिषदांच्या सात प्रभागांतील निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सिन्नरचे चार, ओझरचे दोन तसेच चांदवड नगरपरिषदेचा एक प्रभाग समाविष्ट आहे.

सिन्नर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक २, ४, ५ व १०, ओझर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १ व ८ आणि चांदवड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ येथील निवडणुका तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्या आहेत. या प्रभागांसाठी स्वतंत्र व सुधारित निवडणूक कार्यक्रम ४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी जाहीर करणार आहेत. त्या कार्यक्रमानुसार २० डिसेंबर रोजी मतदान, २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून, २३ डिसेंबरपूर्वी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

या संदर्भातील आदेश पाहण्यासाठी खाली क्लिक करा

अटॅचमेंट पहा
इतर बातम्या
उद्या

गंगापूर धरण

Join Whatsapp Group