२००८ साली रेल्वे भरतीदरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण करत रेल्वेचे देखील मोठे नुकसान केलं होतं. "मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या" असा आरोप करत, राज ठाकरे यांनी परप्रांतीयांना लक्ष्य केले आणि त्यांच्यात हिंसाचाराला प्रोत्साहन दिले, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले. या हल्ल्यांच्या प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी आज ठाणे न्यायालयात सुनावणी होती. या सुनावणीसाठी राज ठाकरे ठाणे न्यायालयात दाखल झाले होते.
परप्रांतीयांच्या रेल्वे भरती प्रकरणावरून सुरू असलेल्या या खटल्यात कोर्टाने त्यांना ‘गुन्हा मान्य आहे का?’ असा सवाल विचारला असता, राज ठाकरे यांनी मान्य नाही असे उत्तर दिले. ठाणे सत्र न्यायालयात काही वेळापूर्वीच राज ठाकरे पोहोचले होते, जिथे त्यांच्या प्रकरणावर सुनावणी झाली. या खटल्यासंदर्भात त्यांना समन्स बजावण्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीमुळे ठाणे न्यायालय परिसरात मनसैनिकांची मोठी गर्दी जमली होती. ज्यांनी राज ठाकरेंचे स्वागत केले.
पुढील तारीख अजून पडली नाही, थोड्या वेळाने ती येईल. राज ठाकरे आज हजर झाले. मात्र पुन्हा त्यांना हजर राहण्याची गरज नाही. आज गुन्हा कबूल आहे की नाही? विचारण्यात आले. मात्र राज ठाकरे यांनाही गुन्हा कबूल नाही असे सांगितले. येत्या एका महिन्यात केस पूर्ण होईल, त्यामुळे कोर्टाला सहकार्य करा, असे न्यायाधीशांनी सांगितले. राज ठाकरे पूर्ण सहकार्य करणार आहेत, अशी माहिती राज ठाकरे यांचे वकील ओंकार राजूरकर यांनी सुनावणी झाल्यानंतर दिली