मु्ंबईत तीस वर्षे राहूनही मला मराठी येत नाही काय करायचं बोल अशा भाषेत वक्तव्य करणारे उद्योजक सुशील केडिया यांना अखेर शहाणपण सुचलं आहे. सुशील केडिया यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल जाहीर माफी मागितली आहे.
मराठी बोलण्याचा मी प्रयत्न करेन. मी जे काही बोललो ते चुकीच्या मानसिकतेतून आणि तणावातून बोललो होतो. माझ्या त्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढून काहींनी वाद निर्माण केला असे केडिया यांनी म्हटले आहे.
दरम्यान, केडिया यांच्या वक्तव्यावर संतप्त होत मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचं ऑफीस फोडलं होतं. या घटनेनंतर वाद वाढत असल्याचे लक्षात येताच त्यांनी माफी मागितली आहे.