५ जुलै २०२५
आज मुंबईच्या वरळी डोममध्ये ‘मराठी विजयी सोहळा’ मोठ्या उत्साहात पार पडत आहे. हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानंतर हा सोहळा मराठी अस्मितेचा विजय म्हणून साजरा करण्यात येत आहे. या ऐतिहासिक दिवशी संपूर्ण महाराष्ट्राचे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे लक्ष लागले आहे.
राज ठाकरे यांच्यानंतर व्यासपीठावर उभे राहून उद्धव ठाकरेंनी उपस्थित जनतेला थेट संबोधित केलं. या भाषणादरम्यान त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं ; 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी' या वक्तव्यातून उद्धव ठाकरेंनी स्पष्ट संकेत दिले आहेत.
Copyright ©2026 Bhramar