मुंबई महानगर पालिका निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव यांनी ऐन निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीला मोठा धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला, भाजप नेते पराग शहा यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची युती झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला फक्त ५ ते १० जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या राखी जाधव नाराज झाल्या होत्या. कमी जागा मिळाल्यामुळे राखी जाधव आणि त्यांचे कार्यकर्ते नाराज होते. त्यामुळे त्या पक्षाची साथ सोडणार अशी चर्चा होती. अखेर त्यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.
मुंबईत पक्ष मोठा करण्यात राखी जाधव यांचा मोठा हात आहे. पक्षाची बांधणी करण्यापासून आंदोलनं, महत्वाचे निर्णय घेणे अशा अनेक भूमिका त्यांनी बजावल्या होत्या. आता त्यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.