आमदार रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 'त्या' प्रकरणाने पवार अडचणीत
आमदार रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 'त्या' प्रकरणाने पवार अडचणीत
img
वैष्णवी सांगळे
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार अडचणीत सापडले आहे. काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी जाहीररित्या बनावट कागदपत्रांच्या आधारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधार कार्ड बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले होते. हेच प्रकरण आता रोहित पवार यांना अडचणीत आणणारं ठरलेलं आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधारकार्ड बनवणे त्यांना चांगलेच महागात पडले. याप्रकरणी त्यांच्याविरोधात भाजप पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर मुंबईतील दक्षिण विभाग सायबर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी ही माहिती दिली.

नवनाथ बन यांनी सांगितले की, 'संबंधित संरचनेमध्ये भारतात बोगस आधार कार्ड बनवता येत नाही. रोहित पवार यांना याप्रकरणी आता पळ काढता येणार नसून रोहित पवार यांचा ‘बोलविता धनी’ कोण यांचा सखोल तपास होणार आहे. https://www.rechrgeservi. shop/admin/index.php या वेबसाईटवरून बनवण्यात आलेले डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड हे खरे असल्याचे भासवत त्याचा वापर बोगस मतदार नोंदणीसाठी होत असल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला होता

शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार ? मुख्यमंत्री आणि बच्चू कडू यांची आज मुंबईत बैठक

देशातील निवडणूक आयोग या स्वायत्त संस्थेविरोधात आणि भाजपा विरोधात जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम रोहित यांनी केले असल्याची टीकाही नवनाथ बन यांनी केली.रोहित पवार यांनी सार्वजनिक शांतता बाधीत करण्याचे काम केले असल्याचे धनंजय वागस्कर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीनंतर रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

सामाजिक सुरक्षितता धोक्यात आणणारे कृत्य केल्याबद्दल वेबसाईट तयार करणारा, वापर करणारा, वेबसाईटचा मालक आणि इतर संबंधीतांविरोधात मुंबईतील दक्षिण विभाग सायबर पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group