राज्याच्या कायदेमंडळची इभ्रत वेशीला; हाणामारीनानंतर आता आव्हाडांच्या मुलीला गलिच्छ शिव्या
राज्याच्या कायदेमंडळची इभ्रत वेशीला; हाणामारीनानंतर आता आव्हाडांच्या मुलीला गलिच्छ शिव्या
img
दैनिक भ्रमर
विधान भवनाच्या लॉबीत टोळी युद्ध पाहिल्यानंतर यापेक्षा आपली गावकी बरी म्हणण्याची वेळ आली आहे. आता हे टोळी युद्ध थेट आमदाराच्या कुटुंबियांना, मुलीला गलिच्छ शिवीगाळ करण्यापर्यंत, धमकी देण्यापर्यंत पोहचल्याचा आरोप करण्यात येत आहे.

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते विधानभवनाच्या लॉबीत भिडले. गुरुवारी संध्याकाळी विधानभवनाच्या लॉबीत आव्हाड कार्यकर्ते नितीन देशमुख उभे असताना तिथे पडळकर समर्थक हृषीकेश टकलेही होते. देशमुख हे आव्हाडांचे समर्थक असल्याचे टकले यांना समजल्यावर ते शिवीगाळ करत देशमुखांच्या अंगावर धावले. 

दोघांमध्ये बाचाबाची होऊन प्रकरण थेट हाणामारीवर पोहोचल्याचे पाहायला मिळाले. तर आज रोहित पवारांकडून एक खळबळजनक दावा करण्यात आलाय. जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून गलिच्छ शिव्या देण्यात आल्या. रोहित पवारांचा पडळकरांच्या कार्यकर्त्यांवर हा आरोप करण्यात आला आहे.

‘जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीबद्दल खालच्या पातळीवर जाऊन बोलतात. जितेंद्र आव्हाड यांच्या आई-बहिणी काढतात इतकंच नाहीतर जितेंद्र आव्हाड यांचा मर्डर करण्याची भाषा करतात त्यामुळे त्यांची पातळी काय असेल हे तुम्ही समजून घ्या’, असं म्हणत रोहित पवारांनी पडळकरांच्या कार्यकर्त्यांवर आरोप केलाय.
इतर बातम्या
Join Whatsapp Group