विधानसभेमध्ये रमी प्रकरणावरून आता पुन्हा एकदा राजकारण तापले असून याप्रकरणी राज्याचे क्रीडा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांनी नाशिक न्यायालयामध्ये आ. रोहित पवार यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान भवनामध्ये उपस्थित असलेल्या त्या वेळचे कृषिमंत्री आणि आत्ताचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे हे ऑनलाइन रमी खेळत असल्याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या प्रकरणी त्यावेळेस मोठा गदारोळ झालेला होता.
या सर्व प्रकरणी वातावरण शांत झाले की काय अशी परिस्थिती असताना पुन्हा एकदा या राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सर्व प्रकरणी राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिकच्या न्यायालयामध्ये आमदार रोहित पवार यांच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे. या याचिकेवर जबाब नोंदवण्यासाठी आज सकाळी कोकाटे हे या ठिकाणी दाखल झालेले होते.
विधान परिषद सदस्य असलेले रोहित पवार यांना विधानसभेमध्ये येण्याची परवानगी नाही तरी ते का आले, त्यांना हा व्हिडिओ कोणी पुरवला, त्यामध्ये कोण आहे हे रोहित पवार यांनी आता सांगावे कारण त्यांनी नियमाचे उल्लंघन केलेलं आहे. त्यामुळे पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी कोकाटे यांनी केली आहे.