वादग्रस्त वक्तव्याने नेहमी चर्चेत राहणारे राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. माणिकराव कोकाटे यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या विरोधात केलेले वक्तव्य त्यांना भोवण्याची शक्यता असून त्यांच्याकडील कृषिखाते काढून घेण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती आहे.माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढून घेतलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
माणिकराव कोकाटे यांचं मंत्रीपद काढून न घेता त्यांच्या खात्यात फक्त बदल करून त्यांना अभय दिले जाणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे.विधानपरिषदेत रमी खेळणे,शेतकऱ्यांसंदर्भात वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणे यामुळे माणिकराव कोकाटेंविषयी नाराजी वाढलेली आहे.
परंतु पहिल्यांदाच त्यांना मंत्री केले असल्याने लगेच त्यांचे मंत्रीपदावरून काढणे योग्य ठरणार नसल्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे मत असल्याचे समजते. सध्या मकरंद पाटील यांच्याकडे कृषी खात्याच कारभार सोपवण्यात येणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलय. मकरंद पाटील यांच्याकडे सध्या मदत आणि पुनर्वसन खातं आहे. पाटील यांच्याकडे कृषीमंत्रीपद सोपवल्यानंतर त्यांचं मदत आणि पुनर्वसन खातं हे कोकाटे यांना देणार अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.