अजित पवारांच्या शिलेदारास अटक, 'ते' प्रकरण भोवलं
अजित पवारांच्या शिलेदारास अटक, 'ते' प्रकरण भोवलं
img
Vaishnavi Sangale
राज्यात राजकीय वातावरण तापलेलं असताना आणखी मोठी बातमी समोर आली आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधानसभागृहात ऑनलाइन गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. शेतकरी संकटात असताना कृषीमंत्री सभागृहातच ऑनलाइन गेम खेळत असल्यामुळे राज्यातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणामुळे सुनील तटकरे यांच्यासमोर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लातूरमध्ये आंदोलन केले अन् निवेदन दिले.

यावेळी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले अन् सूरच चव्हाण यांचा राग अनावर झाला. सूरच चव्हाण आणि १० जणांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. ज्यामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले होते. विजय घाडगे यांना बेदम मारहाण झाली होती त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरु आहेत.  या संपूर्ण प्रकाराने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठी टीका झाली होती. यामुळे सुरज चव्हाण यांना राजीनामाही द्यावा लागला. 

धक्कादायक ! अधिकाऱ्याने स्वतःच्याच घरात लावला स्पाय कॅमेरा, बायकोचे अंघोळीचे व्हिडीओ काढून...

या मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांच्यासह १० जणांना अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी सूरज चव्हाण याच्याकडून पदाचा राजीनामाही घेतला होता. आता लातूरमध्ये सूरज चव्हाण यांच्यासह १० जणांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सुरज चव्हाण पोलिसांना शरण आले आहेत. पोलिसांकडून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून अटक करण्यात आली आहे

इतर बातम्या
Join Whatsapp Group