मॅडम पैसे मिळालेत...एका कॉलने बिघडवला ‘मॅडम’चा खेळ, नव्या वर्षात मोठा धमाका
मॅडम पैसे मिळालेत...एका कॉलने बिघडवला ‘मॅडम’चा खेळ, नव्या वर्षात मोठा धमाका
img
वैष्णवी सांगळे
महिला आयआरएस अधिकाऱ्याला वर्षाच्या पहिल्याच दिवशी सीबीआयने अटक करत मोठा धक्का दिला आहे. एका फोन कॉलमुळे आयआरएस मॅडमला चांगलेच गोत्यात आणले. झाशी रेंजच्या सीजीएसटी उपायुक्त प्रभा भंडारी यांना लाचखोरी प्रकरणात सीबीआयने अटक केली. ही अटक एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही, तिथे एका रेकॉर्ड केलेल्या फोन कॉलने ‘मॅडम’च्या सर्व काळ्या कृत्यांचा पर्दाफाश झाला आणि त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या.

एका रेकॉर्ड केलेल्या फोन कॉलमध्ये तिने सुप्रिटेंडेंट्सना ७० लाख रुपयांचे सोन्यात रूपांतर करण्याचे आदेश दिले होते. मात्र हा फोन कॉल ट्रेस केल्यानंतर, सीबीआयने झाशी, दिल्ली आणि ग्वाल्हेरमध्ये छापे टाकले आणि सुमारे ९ कोटी रुपयांची मोठी रोख रक्कम, सोने-चांदी आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली. या प्रकरणात दोन सुप्रिटेंडेंट, एक फर्म मालक आणि एका वकिलालाही अटक करण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश एका कॉल रेकॉर्डिंगमुळे झाला. सीबीआय काही काळापासून या सिंडिकेटवर लक्ष ठेवून होती. कर चुकवेगिरी प्रकरण मिटवण्यासाठी एका फर्म मालकाला 1.5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप या आरोपींवर आहे. या डीलनुसार, पहिला हप्ता 70 लाख रुपयांत देण्यात येणार होता. त्यानंतर सीबीआयने सापळा रचला.

तेव्हा एका सुप्रिटेंडंटने प्रभा भंडारी यांना फोन करून केला आणि ‘मॅडम, मिळाले सापडले आहेत.’ असं सांगितलं. मात्र त्यावर उपायुक्त प्रभा भंडारी यांची प्रतिक्रिया खूपच धक्कादायक होती. ‘ठीक आहे, ते (पैसे) आता सोन्यात बदला आणि मला द्या’ असे निर्देश त्यांनी दिले. रोख रकमेच्या तुलनेत सोन लपवणं जास्त सोपं पडेल असा त्यांचा प्लान होता, पण सीबीआय त्यांचे सर्व कॉल रेकॉर्ड करत असल्याची कल्पना त्यांना नव्हती. त्यामुळेच जेव्हा लाच म्हणून घेतलेली रक्कम सोन्यात रुपांतरित करण्याचा, बदलण्याचा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा सीबीआय अधिकाऱ्यांनी सर्वांचा मुसक्या आवळल्या.

या अटकेनंतर लगेचच, सीबीआयच्या पथकांनी झाशी, दिल्ली आणि ग्वाल्हेर येथील जागेवर छापे टाकले. यावेळी लाखो रुपयांची रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे मोठ्या प्रमाणात दागिने अशा अनेक वस्तू सापडल्या. दिल्ली आणि इतर पॉश भागात कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. लॅपटॉप, मोबाईल फोन आणि अनेक डायरी जप्त करण्यात आल्या असून त्यामध्ये कंपन्यांकडून लाच घेतल्याचा हिशोब लिहीला असावा असा संशय आहे. सीबीआयने झांशी येथील ऑफीस आणि घरही सील केलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group