'बिग बॉस मराठी 5' चा ग्रँड फिनाले महाराष्ट्रात गाजला. या शोने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. 'बिग बॉस मराठी 5' जिंकण्याचा बहुमान सूरज चव्हाणला मिळाला आहे. आता सर्वत्र सूरजच कौतुक होताना पाहायला मिळत आहे. कलाकारांसोबत नेतेमंडळीही सूरजचं भरभरून कौतुक करत आहेत.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सूरज चव्हाणचं तोंड भरून कौतुक केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर सूरजच्या विजयाची पोस्ट शेअर करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
सूरज 'बिग बॉस मराठी 5' जिंकल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला आहे. अजित पवार यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, "आमच्या बारामतीचा सुपुत्र सूरज चव्हाण बिग बॉस मराठी 5चा विजेता ठरला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत सूरजनं हे यशाचं शिखर गाठलं आहे. सूरज आपल्या मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. त्यानं मिळवलेल्या यशामुळे बारामतीचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढला आहे. सूरजला उत्तम भविष्यासाठी खूप शुभेच्छा!" असे उपमुख्यमंत्री अजित पवार बोले आहेत.
अजित पवार यांच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स येत आहेत. सूरजचे चाहते त्याच्या विजयानंतर खूप खुश झाले आहेत. गायक अभिजीत सावंतने उपविजेते पद भूषवले आहे. तर निक्की तिसरी आली आहे. जान्हवी किल्लेकरने ट्रॉफी ऐवजी पैशांची बॅग निवडली. यंदाचे 'बिग बॉस मराठी 5'सीझन खूप गाजले आहे. सदस्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.