‘बिग बॉस मराठी ६’च्या घरातून ‘चांगला माणूस’ बाहेर, नेटकऱ्यांमध्ये नाराजी
‘बिग बॉस मराठी ६’च्या घरातून ‘चांगला माणूस’ बाहेर, नेटकऱ्यांमध्ये नाराजी
img
वैष्णवी सांगळे
बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन चांगलाच रंगला आहे. घरातील सदस्यांच्या वागणं, एकमेकांविरोधातली कट-कारस्थान सर्वच गोष्टी रंगात आल्या आहेत. पण, अजूनही काही स्पर्धकांचे डोळे उघडलेले नाही. तर, काही स्पर्धक अजूनही आपला खेळ दाखवत नाहीत, अशी खंत भाऊच्या धक्क्यावर अनेकदा रितेश देशमुखनं व्यक्त केली आहे. 

'बिग बॉस मराठी'च्या घरातून सहाव्या आठवड्या कोण घराबाहेर जाणार? याची संपूर्ण आठवडाभर चर्चा सुरू होती. सहाव्या आठवड्यामध्ये घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी रोशन, सागर, राकेश, दीपाली, अनुश्री, रुचिता, सचिन, प्रभू आणि प्राजक्ता असे नऊ स्पर्धक नॉमिनेट झाले होते. या स्पर्धकांमधून तीन स्पर्धक डेंजर झोनमध्ये तर उर्वरित सहा स्पर्धक सेफ झोनमध्ये गेले. रोशन, रूचिता आणि सचिन हे तिघे डेंजर झोनमध्ये होते. या तिघांमधून एकाला घरचा रस्ता धरावा लागला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातून खान्देशचा किंग सचिन कुमावत घरातून एलिमिनेट झाला. 

अहिराणी गाण्यासाठी प्रसिद्ध असलेला आणि खान्देशी किंग म्हणून नावारुपाला आलेला सचिन कुमावत बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट झाला आहे. घरातील चांगला माणूस अशी ओळख त्याच्या चाहत्यांमध्ये निर्माण करण्यात मात्र सचिन कुमावत यशस्वी ठरला. त्याचं घरातील प्रत्येक स्पर्धकासोबत खूप घट्ट नातं निर्माण झालेलं. पण, घरात स्वतःसाठी स्टँड घेण्यात कमी पडल्यामुळे 'बिग बॉस मराठी'च्या घरातील त्याचा प्रवास संपला. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group